`थ्री के`... करिनाचं नवीन नाव!, Kareena Kapoor changes name to Kareena Kapoor Khan

`थ्री के`... करिनाचं नवीन नाव!

`थ्री के`... करिनाचं नवीन नाव!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

करीना कपूर खान... हे आहे ‘बेबो’चं नवीन नाव... करीनाच्या आगामी ‘सत्याग्रह’ या चित्रपटात तिचं नाव असंच दिसेल.

करीनानं गेल्याच वर्षी अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाह केला. त्यानंतर लगेचच तिचा ‘तलाश’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटात नाव न बदलण्याचा निर्णय घेतल्यानं करीना कपूर असचं नाव या सिनेमाच्या क्रेडीट रोलमध्ये दिसलं. पण, लग्नानंतर आता तिचा दुसरा सिनेमा रिलीज होतोय, या सिनेमात तिनं आपल्या नावापुढे पतीचं आडनाव अर्थात ‘खान’ जोडलंय.

करिअर फॉर्ममध्ये असताना कलाकार आपल्या नावात बदल करण्यास फारसे उत्सुक नसतात. पण, आपलं लक फॅक्टर आजमावण्यासाठी आपल्या नावाच्या अक्षरांत (स्पेलिंगमध्ये) बदल करण्याचा प्रयोग मात्र आजकाल सर्वमान्य झालाय.

टॅरोट कार्ड रिडर आणि अंकगणित तज्ज्ञ श्रद्धा सल्ला यांनी करीनासाठी ‘KKK’ (थ्री के) हे नाव लकी असल्याचं मानतात. करीनाच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनात नावातील हा बदल लाभदायक ठरेल, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला यानंतर एक शांत, परिपक्व करीना पाहायला मिळेल, असंही त्यांचं म्हणणं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 29, 2013, 15:58


comments powered by Disqus