मी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर, kareena kapoor feels insecure

मी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर

मी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री करीना कपूर हिच्या म्हणण्यानुसार, ती स्वत:ला सुरक्षित समजत नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये घडलेल्या काही हादरवून टाकणाऱ्या घटनांमुळे करीना सध्या मुंबईत स्वत:ला सुरक्षित समजत नाही. तिच्यात नेहमीच असुरक्षिततेची भावना भरून राहिलेली असते. महिलांच्या सुरक्षेबद्दल एका कार्यक्रमात करीना बोलत होती.

तू स्वत:ला मुंबईत सुरक्षित समजतेस का? या प्रश्नावर उत्तर देताना करीना म्हणते, मी दोन वर्षांपूर्वीपर्यंत स्वत:ला सुरक्षित समजत होते. पण, गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत असुरक्षिततेचं वातावरण भरून राहिलंय. काही महिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनांमुळे तर दिल्लीच नाही तर आपल्या शहरांतही असुरक्षिततेचं वातावरण तयार झालंय. त्यामुळे माझ्यातही नेहमी असुरक्षिततेची भावना तयार झालीय.

देशात महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या दुष्कृत्यांमध्ये झालेल्या वाढीसंबंधी, सैफ अली खानची पत्नी करीनानं आश्चर्य व्यक्त केलंय. ‘जर मी रात्री शूटींगवर असेल तर माझ्या आईला माझ्याबाबतीत चिंता लागून राहते. जेव्हा मी खूप उशीरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत शूटींगवर असते तेव्हा जेवढं शक्य असेल तेवढा वेळ माझी आई जागी राहण्याचा प्रयत्न करते... मग, मला दररोज घरी पोहचल्यानंतर तिला मॅसेज करावाच लागतो’ असं करीनानं म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 22, 2013, 16:25


comments powered by Disqus