Last Updated: Tuesday, March 18, 2014, 15:17
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला तमन्ना भाटियामध्ये बहीण करिश्माची छबी दिसते. तमन्ना करीनाचा पती सैफ अली खान सोबत `हमशक्ल` चित्रपटात दिसणार आहे.
करीना सैफ अली खानला मॉरीशसमध्ये चालू असलेल्या शूटिंगमध्ये भेटायला गेली होती. शूटिंगदरम्यान करीना तमन्नाला भेटली. `तमन्नाला पाहिलं की मला माझी बहीण लोलोची (करिश्मा कपूर) आठवण येते`. तू लोलोसारखीच दिसतेस असं करीनानं म्हटलं.
तमन्ना भाटियाने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला `हिम्मतवाला` मध्ये काम केलंय. सध्या ती सैफ अली खानसोबत `हमशक्ल`मध्ये काम करत आहे. साजिद खान निर्मित `हमशक्ल`मध्ये सैफ अली खान, रितेश देशमुख, राम कपूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २० जूनला प्रदर्शित होतोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Tuesday, March 18, 2014, 15:17