Last Updated: Saturday, October 5, 2013, 15:45
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई बॉलिवूडची बेबो अर्थातच करीना कपूर बनवणारंय सिक्स पॅक अॅब्स! त्यासाठी ती तयारीला लागली आहे. त्यामुळे करीनाचा सेक्सी सिक्स पॅक अॅब्स पाहायला मिळणार आहे.
‘शुद्धी’ या आपल्या आगामी चित्रपटातील भूमिकेविषयी करीनाने सांगितंल की, या चित्रपटासाठी सिक्स पॅक अॅब्स बनवणार आहे. तसेच मार्शल आर्टही शिकणार आहे. मार्शल आर्टची ट्रेनिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याचं तिने पुढं म्हटलंय.
‘शुद्धी’ या चित्रपटात करीनासोबत हृतिक रोशन प्रमुख भूमिकेत आहे. आजपर्यंत बॉलिवूडमध्ये फक्त अभिनेत्यांचेच सिक्स पॅक अॅब्स होते. आता यात अभिनेत्रीच्या रूपाने करीनाची भर पडणार आहे.
करीनानेच बॉलिवूडमध्ये ‘झिरो फिगर’ची क्रेझ निर्माण केली होती. आता बेबो, सिक्स पॅक अॅब्सचीही क्रेझ निर्माण करते का, हे बघणं रंजक ठरेल.
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने सर्वात पहिल्यांदा ओम शांती ओम करिता सिक्स पॅक अॅब्स बनवले होते. त्यानंतर गजनीसाठी आमिर खानने एट पॅक अॅब्स बनवले होते. बॉलिवूडमध्ये आता तर जणू अॅब्स दाखवण्यची स्पर्धाच सुरू झाली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, October 5, 2013, 11:38