करीना म्हणते सैफ जास्तच हॉट,Kareena Kapoor talks about ‘cheating on’ Saif Ali Khan

करीना म्हणते सैफ जास्तच हॉट

करीना म्हणते सैफ जास्तच हॉट
www.24taas.com,नवी दिल्ली

बॉलिवुडमधील सैफिना जोडी, करीना आणि सैफ अली खान. या जोडीचे धुमधडाक्यात लग्न झाले. लग्नानंतर प्रथमच करीनाने एका लाईफस्टाईल मासिकाला मुलाखत दिली. करीनाने आपल्या आधीच्या प्रेमप्रकरणाची कबुली दिली. या मुलाखतीदरम्यान करीना म्हणाली, सैफ जास्तच हॉट आहे.

करीनाने बॉलिवूडच्या रंगीन दुनियेत अन्य हिरोईन्सपेक्षा आपण वेगळीच असण्याचा प्रयत्न केला आहे. करीनाने कधीही आपल्या खासगी जीवनातील घडामोडी लपवण्याचा प्रयत्न केला नाही, मग शाहिद सोबत असलेलं प्रेमसंबंध असो किंवा सैफसोबत असलेलं संबंध असोत. आता तर करीना आणि सैफ यांच लग्न देखील झालंय. सैफसोबत असलेल्या प्रेमसंबंधाबद्दल जेव्हा कोणी तिला वाकडा प्रश्न विचारला तरी ती अगदी बेधडकपणे उत्तरे देते. त्याचाच प्रत्यय दिसून आला.

करीनाला जेव्हा मुलाखतीत विचारलं गेलं की, कधी करीना आपला पती सैफचा विश्वासघात करेल का? किंवा प्रतारणा करेल का? करीनाने तेव्हा स्पष्ट केलं की, जेव्हा आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत खूश असतो त्यावेळी विश्वासघात किंवा प्रतारणा करण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा आपण खूश नसतो याच स्थितीत आपण असं काहीतरी करतो.

करीनाला असाही प्रश्न विचारला गेला की, या करीना बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त हॉट हिरो कोणाला मानते तर यावर बेबोनं म्हटलं की फक्त सैफ, सैफ, आणि फक्त सैफचं. करीनाला लग्नानंतर आलेला अनुभव तिच्याच तोंडून ऐकायला मिळाला ना.

First Published: Thursday, October 25, 2012, 15:35


comments powered by Disqus