Last Updated: Monday, September 24, 2012, 19:23
www.24taas.com, नवी दिल्ली बॉलिवूडची आत्तापर्यंतचं बहुप्रतिक्षित ठरलेला लग्नसोहळा म्हणजे करीना-सैफचा होणार होणार अशी चर्चा असलेला लग्नसोहळा... हा सोहळा पाहण्यासाठी दोघांचेही फॅन्स प्रचंड उत्सुक आहेत. पण, ‘आमचं लग्न अगोदरच झालंय आणि या डिसेंबरला आम्ही आमचा २५०वा हनीमून साजरा करणार असल्याचा’ नवाच खुलासा करीनानं केलाय. त्यामुळे, या दोघांच्या होणाऱ्या किंवा झालेल्या लग्नाबद्दलचं गूढ मात्र वाढल्याचं तिच्या चाहत्यांना वाटतंय.
करिनाची होणारी सासू म्हणजे शर्मिला टागोर यांनी या दोघांच्या लग्नाची घोषणा केल्यानंतर बॉलिवूड वर्तुळात या दोघांच्या लग्नासंबंधी चर्चा वाढल्यात. पण, करिनाला मात्र या लग्नाच्या चर्चाबद्दल फारसं सोयरसुतक नसल्याचं अनेकांना जाणवतं. यामागचं कारण स्पष्ट करून करिनानं या चर्चांना आणखीनच फोडणी दिलीय.
नुकतंच एका वर्तमानपत्राशी बोलताना करीनानं आपल्या वैवाहिक जिवनाचा खुलासा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आपण सैफ अली खानबरोबर याआधीच वैवाहिक बंधनात अडकलो आहोत. आम्हाला दोघांना आता फक्त या लग्नाच्या कायदेशीर बाबी पूर्ण करायच्यात, असं करीनानं म्हटलंय.
एव्हढचं नाही तर करीनानं, आपण आणि पती सैफनं मिळून एक घरही खरेदी केलंय, ज्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून आपण दोघे एकत्र राहत आहोत, असाही खुलासा करीनानं केलाय. येत्या डिसेंबर महिन्यात जर आम्ही दोघे सुट्टीवर गेलो तर तो आमचा २५०वा हनीमून असेल, या वाक्यानं तर करीनानं अनेकांना धक्का दिलाय.
First Published: Monday, September 24, 2012, 19:23