‘हिरोईन’चा २५ कोटींचा डल्ला!, Kareena Kapoor’s ‘Heroine’ grosses Rs 25cr in opening weekend!

‘हिरोईन’चा २५ कोटींचा डल्ला!

‘हिरोईन’चा २५ कोटींचा डल्ला!
www.24taas.com, नवी दिल्ली
ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलंही! होय, आपण बोलतोय ‘हिरोईन’बद्द्ल... आपल्या जोरदार अभिनय प्रदर्शनानं करीना कपूरनं सगळ्याचं प्रेक्षकांवर मोहिनी घातलीय. त्याचाच परिणाम म्हणजे, हिरोईननं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल २५ कोटींचा डल्ला मारलाय.

‘हिरोईन’ या सिनेमातील माही अरोरा हिला करीनानं आपलंस केलं. या भूमिकेत तीनं तिचा जीव ओतून अभिनय केलेला दिसतो. स्वत: करिनानंदेखील ही भूमिका आपली आजवरची सगळ्यात श्रेष्ठ भूमिका असल्याचं म्हटलंय. माही... जी फिल्म इंडस्ट्रीचा जीव आहे जिची प्रत्येक अदा लोकांना भाळून टाकते. तीचं माही एका टप्प्यावर येऊन धक्केही खाते. अशा माहीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. सिनेमा समीक्षकांनी या सिनेमाला संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी मधूर भांडारकरच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सगळ्यांची तोंडं बंद केलीत. याचं सगळं श्रेय जातं ते या सिनेमातील मुख्य पात्राला... माहीला... करीना कपूरला...

रिलीज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर एकच धम्माल उडवून दिलीय. एकाच आठवड्यात या सिनेमानं तब्बल २५ कोटींची कमाई केलीय.

First Published: Tuesday, September 25, 2012, 13:22


comments powered by Disqus