करीनाचं ‘सॉफ्ट टार्गेट’..., kareena`s soft target

करीनाचं ‘सॉफ्ट टार्गेट’...

करीनाचं ‘सॉफ्ट टार्गेट’...
www.24taas.com, मुंबई
‘हिरोईन’नंतर करीना कपूर पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आतूर झालीय. ‘हिरोइन’सारखी बोल्ड भूमिका केल्यानंतर करिनाचं आता ‘सॉफ्ट टार्गेट’ कडे वळलीय. सॉफ्ट टार्गेट म्हणजे, तिला आता हलका-फुलका सिनेमा करायचाय.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा सिनेमा करीना करण्याच्या विचारात आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम पुनित मल्होत्रा यांच्याकडे सोपवलं गेलंय. हिरोइन चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केल्यानंतर करीनाने थोड्या काळासाठी ब्रेक घेतला होता. तिच्या आगामी चित्रपटात ती पुन्हा एकदा इमरान खान सोबत दिसणार आहे.

‘हिरोइननंतर मला एखादा हलका-फुलका सिनेमा करायचंय. त्यातही मजा येईल… एक मै और एक तू’नंतर इमरान सोबत पुन्हा एकदा सिनेमा करायला मला आवडेल’ असं करीनानं म्हटलंय. जसं आपल्याला माहितच आहे की, पुनित मल्होत्राचे सिनेमे पारंपारिक विषयावरचे नाच-गाण्यांनी भरलेले असतात. करीनालाही असाच सिनेमा आता करायचाय. सध्यातरी या आगामी सिनेमाचे नाव ठरवण्यात आलेले नाही.

First Published: Monday, October 1, 2012, 18:23


comments powered by Disqus