संगीत सोहळ्यात थिरकली बिनधास्त बेबो…, kareena - saif sangit ceremony

संगीत सोहळ्यात थिरकली बिनधास्त बेबो…

संगीत सोहळ्यात थिरकली बिनधास्त बेबो…
www.24taas.com, मुंबई
‘सैफीना’... सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नघटीकेसाठी केवळ काही तास उरलेत. त्याअगोदर रविवारी करीनाच्या घरी एका संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते.

आयुष्यातल्या एका खास सोहळ्यासाठी सजलेली करीना खूप सुंदर दिसत होती. पिवळ्या रंगाची ओढनी परिधान केलेल्या करीनानं सोनेरी रंगाचा लेहेंगा-चोली परिधान केली होती. हा रंग सैफचा आवडता रंग असल्यानं करीनानं त्याच रंगाचा ड्रेस परिधान केला होता, असं म्हटलं जातंय. तिचा जवळचा मित्र आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यानं तिच्यासाठी हा खास ड्रेस बनविला होता. याबरोबरच नेहमी मॉड दिसणाऱ्या करीनानं आपल्या केसांत गजराही माळला होता. त्यामुळे तर ती अगदी भारतीय रुपात अतिशय उठून दिसत होती.

आपल्या संगीत सोहळ्याचा आनंद करीनानं पूरेपूर घेतला हा तिचा आनंद तिच्या नाचण्यातून आणि तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होता. आपल्या बहिणीच्या या संगीत सोहळ्याच्या निमित्तानं करिष्मानंही कच धम्माल उडवून दिली. यानिमित्तानं बॉलिवूडमधील तसंच अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होते.

First Published: Monday, October 15, 2012, 16:27


comments powered by Disqus