करीना बनणार शिवशंकराची `पार्वती` Kareena to play Sati

करीना बनणार शिवशंकराची `पार्वती`

करीना बनणार शिवशंकराची `पार्वती`
www.24taas.com, मुंबई

करीना कपूर लवकरच शिवाच्या सतीची भूमिका करताना दिसणार आहे. आणि शिव शंकराची भूमिका ऋतिक रोशन करणार आहे. ‘इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या गाजलेल्या पुस्तकावर करण जोहर ‘शुद्धी’ नावाचा सिनेमा बनवत आहे. हा सिनेमा शंकर-पार्वतीच्या दंतकथेवर आधारित आहे.

गेल्यावर्षी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळीच शिवाच्या भूमिकेसाठी ऋतिक रोशनचं नाव नक्की करण्यात आलं होतं. मात्र सतीच्या भूमिकेत कोण असेल, यावर प्रश्नचिन्ह होतं. कतरिना कैफ, दिपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर या टॉपच्या अभिनेत्रींची या भूमिकेसाठी स्पर्धा सुरू होती. अखेर सतीची भूमिका करीनाच्या पदरात पडली आहे.


करीना आणि ऋतिक यांनी सुरूवातीच्या काळात अनेक सिनेमे एकत्र केले होते. मै प्रेम की दिवानी हूँ, यादे, कभी खुशी कभी गम या चित्रपटात ऋतिक-करीनाची जोडी गाजली होती. मात्र, करीना आणि ऋतिकची जवळीक वाढू लागल्यावर विवाहीत ऋतिकने करीनासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता दोघेही एकत्र काम करण्यास तयार झाले असून लवकरच दोघांना शिव-पार्वतीच्या पौराणिक रुपात पाहाण्याची संधी मिळेल. ऋतिक शक्तिशाली आणि नृत्यनिपुण शिवाच्या भूमिकेत चपखल बसतोय. करीना सतीच्या भूमिकेला किती न्याय देणार हे लवकरच पाहायला मिळेल.

First Published: Tuesday, March 12, 2013, 18:07


comments powered by Disqus