मी कधीच रोझा पाळणार नाही- करीना Kareena will never keep Roza

मी कधीच रोझा पाळणार नाही- करीना

मी कधीच रोझा पाळणार नाही- करीना
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री करीना कपूर आणि तिचा पती अभिनेता नवाब सैफ अली खान यांचं लग्न झालं, तेव्हा ती धर्मांतर करणार की नाही यावरून चर्चेला उधाण आलं होतं. आता जवळपास वर्षभराने पुन्हा त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे ती रमझानवरून.

करीनाच्या चाहत्यांना असे वाटते की, करीना यावेळी रोझा नक्की करेल. पण आपण रोझे पाळणार नसल्याचं करीना कपूरने स्पष्ट केलं आहे. मी आजपर्यंत आयुष्यात एकदाही रोझा पाळला नाही आणि पाळणारही नाही. याविषयी आणखी बोलतांना करीना म्हणाली की, माझा लहान पणापासून या गोष्टींशी काहीही संबंध आला नाहीये,मग हे रोझे मी अचानक कशी सुरू करू?

गेल्या वर्षी सैफ आणि करीना यांचं लग्न झालं. तेव्हाही करीनाने धर्मपरिवर्तनास विरोध केला होता. यावरून बराच गदारोळही उठला होता. मात्र करीना आपल्या विचारांवर ठाम होती. आताही ती रोझा न पाळण्याच्या निर्णयावर ठाम आहे आणि अर्थातच पती सैफचीही तिला साथ आहे...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 29, 2013, 17:14


comments powered by Disqus