Last Updated: Tuesday, May 20, 2014, 19:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईफरहान अख्तरसोबत बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर एका चित्रपटात झळकणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक बिजॉय नांबियारच्या पुढील चित्रपटात करिना कपूर, अमिताभ आणि फरहान यांच्यासोबत दिसू शकते.
बिजॉय यांनी सदर चित्रपटासाठी विचारणा केल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नुकतेच करिना आपल्याला चित्रपटाची कथा आवडल्याचे सांगितले.
मात्र, सिंघम २च्या चित्रपटात काम करण्याबाबतचा निर्णय घेईल असेही ती म्हणाली. यावर बिजॉय म्हणाला की, मी सध्या याबाबत काहीच बोलू शकत नाही. पण या चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्रा करणार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 20, 2014, 19:18