Last Updated: Saturday, January 12, 2013, 11:22
www.24taas.com, मुंबई ‘बीग बॉस सीझन ६’ या कार्यक्रमात दिसलेली करिष्मा कोटकला चक्क खान बंधुंची लॉटरी लागल्याचं वृत्त आहे. कदाचित, सलमानच्या पुढच्या सीनेमात सलमान खान – करिष्मा कोटक ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते.
तर बातमी अशी आहे की, सिनेमा हिट करायचा फॉर्म्युला सलमान खानला घेऊन सोहेल एक सिनेमा बनवतोय. हा नवीन सिनेमा या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची त्याची इच्छादेखील आहे. अगोदर ‘शेरखान’ हा सिनेमा बनवण्याचं त्यानं ठरवलं होतं. पण, हा विचार आता काहीसा मागे पडलाय. त्यानंतर त्याच्या नव्या सिनेमाचं नाव अगोदर ‘राधे’ असं ठरवण्यात आलं होतं. आता याच सिनेमाचं नाव बदलून ‘मेन्टल’ असं करण्यात आलंय.
सोहेलला या सिनेमात सलमानसोबत एखादी नवीन हिरोईन हवीय. कारण, पटकथाच तशी आहे, असं तो म्हणतोय. सूत्रांच्या माहितीनुसार, या रोलसाठी करिष्माचा विचार सध्या सुरु आहे. करिष्मानं याअगोदर काही सिनेमांत काम केलंय. बीग बॉसमध्ये दिसलेली चुलबुली करिष्मा अनेकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे तीला ही ‘मेन्टल’ खानची लॉटरी लागण्याची शक्यता जोरावर आहे. याचप्रमाणे बीग बॉस सीझन ६ मध्ये दिसलेला संतोष शुक्लाही या सिनेमात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा निभावणार आहे.
First Published: Saturday, January 12, 2013, 11:22