‘बूम पासून धूम’पर्यंत, कतरिनाची बॉलिवूडमध्ये १० वर्ष!Katarina Kaif Completed 10 years in Bollywood!

‘बूम पासून धूम’पर्यंत, कतरिनाची बॉलिवूडमध्ये १० वर्ष!

‘बूम पासून धूम’पर्यंत, कतरिनाची बॉलिवूडमध्ये १० वर्ष!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

ती आली... तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं... असंच म्हणावं लागेल अभिनेत्री कतरिना कैफ बाबत. सध्याची सर्वात हॉट अभिनेत्री कतरिनाला बॉलिवूडमध्ये येऊन तब्बल १० वर्ष झालीत.

काश्मिरी वडील आणि ब्रिटीश आई यांच्या आठ मुलांपैकी एक असलेली कतरिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. मुंबईत मॉडेलिंग करण्यासाठी आलेल्या कतरिनाची ओळख कैजाद गुस्ताद यांच्यासोबत झाली. त्यांच्याच दिग्दर्शनाखाली बनलेल्या बूम चित्रपटातून कतरिनानं बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. ‘बूम’ ही फिल्म १९ सप्टेंबर २००३मध्ये रिलीज झाली होती. पूर्णपणे फ्लॉप झालेल्या या चित्रपटानंतर कतरिनानं मात्र मागे वळून पाहिलं नाही.

मात्र कतरिनाचा गॉड फादर ठरला तो अभिनेता सलमान खान. या १० वर्षात कतरिनानं शाहरुख, सलमान, हृतिक रोशन, अक्षय कुमार यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं. सध्या कतरिना अभिनेता आमीर खान सोबत ‘धूम-३’मध्ये झळकणार आहे. तर हृतिक सोबत ‘बँग-बँग’मध्ये ती दिसेल.

अपने, रेस, न्यूयॉर्क, ब्लू, अजब प्रेम की गजब कहानी, राजनिती, जिंदगी ना मिलेगी दुबारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि जब तक है जान हे कतरिनानं भूमिका केलेले मुख्य चित्रपट आहेत. कतरिना आपल्या आगामी काळातही प्रेक्षकांचं असंच मनोरंजन करत राहो, याच शुभेच्छा!


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013, 12:44


comments powered by Disqus