कतरिना कैफची बहीण इसाबेलही सिनेमामध्ये Katrina`s sister enters in Film

कतरिना कैफची बहीण इसाबेलही सिनेमामध्ये

कतरिना कैफची बहीण इसाबेलही सिनेमामध्ये
www.24taas.com, मुंबई

कतरिना कैफचा हिंदी आणि अभिनय या दोन्ही गोष्टींशी काही संबंध नसतानाही ती बॉलिवूडमध्ये टॉपची अभिनेत्री बनली आहे. आता लवकरच तिची धाकटी बहीण इसाबेल हीदेखील सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

मूळ ब्रिटीश असलेल्या कतरिना कैफने बूम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर सलमान खानशी मैत्री झाल्यामुळे कतरिनाला चांगल्या बॅनरचे सिनेमे तिला मिळू लागले. आणि केवळ सौंदर्याच्या बळावर कतरिना गेलं दशकभर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर देत आघाडीवर राहिली. हिंदी येत नसतानाही तिला फारशी अडचण आली नाही. आता कतरिनाची धाकटी बहिण इसाबेल हिच्यासाठी सलमान खान कॅनडियन सिनेमा निर्माण करत आहे. या सिनेमात इसाबेल विनय विरमानी, कुणाल नय्यर या अभिनेत्यांसोबत दिसेल. भारतातून कॅनडात गेलेल्या तरुण डॉक्टरांची कथा या सिनेमात मांडण्यात येणार आहे.

कतरिना कैफला सहा बहिणी असून त्या आपल्या आईसोबत लंडनला राहातात. इसाबेल ही कतरिनाची धाकटी बहीण आहे. कॅनडात सिनेमा करत असली, तरी इसाबेल बॉलिवूडमध्येही पदार्पण करू इच्छित आहे.

First Published: Saturday, May 4, 2013, 18:42


comments powered by Disqus