२१ वर्षांनी येतोय `खिलाडी`चा सिक्वल, `Khiladi` sequel on, but without Akshay Kumar

२१ वर्षांनी येतोय `खिलाडी`चा सिक्वल

२१ वर्षांनी येतोय  `खिलाडी`चा सिक्वल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

१९९२ साली आलेला ‘खिलाडी’ सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमाने अक्षय कुमारला स्टार बनवलं. थ्रिलर असणाऱ्या या सिनेमातील गाणी चांगलीच गाजली होती. आता २१ वर्षांनी या सिनेमाचा पुढचा भाग येत आहे.

अब्बास-मस्तान या जोडगोळीने दिग्दर्शित केलेला ‘खिलाडी’ सिनेमा १९९२ साली सुपरहिट झाला होता. अक्षय कुमारची या सिनेमात महत्वाची भूमिका होती. अक्षय कुमारचं नाव या सिनेमापासून ‘खिलाडी कुमार’ असं प्रसिद्ध झालं होतं अक्षयसोबत या सिनेमात दीपक तिजोरी, आयेशा झुल्का हे कलाकारही होते. आता २१ वर्षांनी या सिनेमाचा पुढील भाग तयार करताना मात्र यामध्ये अक्षय कुमार पाहायला मिळणार नाही.

‘खिलाडी’ सिनेमा आजच्या तरूण पीढीला नक्कीच आठवत असेल. त्यामुळे या सिनेमाचा पुढचा भाग पाहाताना प्रेक्षकांचा गोंधळ होणार नाही, अशी सिनेमाच्या निर्मात्यांना खात्री आहे. मात्र ‘खिलाडी’ सिनेमाच्या पुढील या पुढील भागात अक्षय कुमार दिसणार नाही. त्याऐवजी कदाचित नवे कलाकारही पाहायला मिळू शकतील. मात्र अक्षय कुमारशिवाय ‘खिलाडी’ सिनेमा पाहायला खरंच लोकांना आवडेल का हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच समजेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 16, 2013, 09:11


comments powered by Disqus