किंग खानने कुणाला दिली काळी मर्सिडीज king khan gifts black Mercedes

किंग खानने कुणाला दिली काळी मर्सिडीज

किंग खानने कुणाला दिली काळी मर्सिडीज

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

किंग खान शाहरूखने फराह खानला काळी मर्सिडीज भेट दिली आहे. बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शक ते चित्रपटनिर्माती असा प्रवास केलेल्या फराह खानला किंग खान शाहरुखने एक काळ्या रंगाची मर्सिडीज "एसयूव्ही` श्रेणीतील गाडी भेट दिली आहे.

किंग खान आपल्या आगामी "हॅप्पी न्यू इअर` चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. शाहरुखने आपली मैत्रीण आणि "हॅप्पी न्यू इअर`ची दिग्दर्शिका फराह खान हिला एक मर्सिडीज गाडी भेट दिल्याचे फराह खाननेच सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

शाहरुखने याआधी फराहसोबत "मैं हूँ ना` आणि "ओम शांती ओम` यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. या दोन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाआधीही शाहरुखने फराहला गाडी गिफ्ट दिली होती.

या जोडीचा तिसरा सिनेमा "हॅप्पी न्यू इअर` लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे, याही वेळेस शाहरुखने फराहला तिसरी गाडी भेट दिलीये.

"हॅप्पी न्यू इअर` या सिनेमात शाहरुखसोबत अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन इराणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 17, 2014, 22:04


comments powered by Disqus