आमिर म्हणाला ‘सलमान सोबत काम करण्याचा वाईट अनुभव’`Koffee with Karan`: I had a bad experience working

आमिर म्हणाला ‘सलमान सोबत काम करण्याचा वाईट अनुभव’

आमिर म्हणाला ‘सलमान सोबत काम करण्याचा वाईट अनुभव’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नवनवीन खुलासे आणि चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. म्हणजे हा भाग अजून प्रसिद्ध व्हायचाय...

या भागात आमिरनं दबंग खान सलमानसोबत काम करण्याचा आपल्याला कसा वाईट अनुभव आला हे सांगितलं. “‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाच्या वेळी मला सलमान खान खूप उद्धट आणि पाषाणहृद्यी वाटला. आमिर म्हणतो, मी त्याला भेटलो तेव्हा मी विनयशील होता. पण मी त्याच्यापासून दूरच राहत होतो. मात्र मी जेव्हा रीनापासून वेगळा झालो. तेव्हा माझ्या त्या काळात सलमान माझ्या सोबत होता. आम्ही एकत्र ड्रिंक करायचो... आमची मैत्री झाली.”

आमिर खान आणि सलमान चांगले मित्र आहेत. दबंग खानची स्तुती करतांना तो थांबत नाही. सलमान खूप मोठा स्टार आहे. तो येतो... शर्टाच्या मागे गॉगल लावतो... बेल्ट हलवतो... सर्व प्रेक्षक त्याच्या या अदांवर फिदा होतात... त्याच्यासारखं स्टारडम माझ्याजवळ नाही, असंही आमिर म्हणाला.

आमिर खान सध्या ‘धूम-३’चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सुरुवातीला नाही पण आता आम्ही चांगले मित्र आहोत, असं सलमानबद्दल आमिर म्हणाला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 15, 2013, 19:26


comments powered by Disqus