`क्रिश ३`ने मोडला `टायगर` आणि `चेन्नई`चा रेकॉर्ड!, Krrish 3 sets new record

`क्रिश ३`ने मोडला `टायगर` आणि `चेन्नई`चा रेकॉर्ड!

`क्रिश ३`ने मोडला `टायगर` आणि `चेन्नई`चा रेकॉर्ड!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

हृतिक रोशनच्या ‘क्रिश ३’ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या क्रिश ३ ने पहिल्या ४ दिवसांतच विक्रमी कमाई करून १०० कोटी क्लबमध्ये एंट्री मिळवली आहे.

इतक्या जलद वेगाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करत क्रिशने ‘एक था टायगर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’चा रेकॉर्ड मोडला आहे. सोमवारपर्यंत या सिनेमाने १०८.६१ कोटी रुपयांची कमाई केली. एवढंच नव्हे, तर एक दिवसातील सर्वाधिक कमाईचा रेकॉर्डही क्रिशच्या नावावर जमा झाला आहे. क्रिश ३ ने सोमवारी एका दिवसात ३५.९१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

हा सिनेमा सुमारे १६५ कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. एखाच वेळी ३,५०० सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. पुढील आठवड्यातही कुठला मोठा सिनेमा रिलीज होत नसल्याने सिनेमाचे पूर्ण पैसे वसूल करणं ‘क्रिश’ला कठीण जाणार नाही.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, November 7, 2013, 13:51


comments powered by Disqus