क्रिश ३ चा बॉक्स ऑफिसवर पराक्रम, Krrrish 3`s record on box Office

क्रिश ३ चा बॉक्स ऑफिसवर पराक्रम

क्रिश ३ चा बॉक्स ऑफिसवर पराक्रम
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिवाळीच्या मुहुर्तावर साधारणतः शाहरुख खानचे सिनेमे प्रदर्शित होऊन रेकॉर्डब्रेक कमाई करतात. पण यंदा तो मुहुर्त हृतिक रोशनने साधला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर अभिनेता हृतिक रोशन सुपरहिरोची भूमिका साकारत असलेला `क्रिश ३` सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

`क्रिश ३` ने पहिल्याच दिवशी सुमारे २६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी हा आकडा ४८ कोटींपर्यंत गेल्याचं सिनेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. रविवारी प्रेक्षकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे प्रतिसाद मिळाल्यास क्रिश ३ सहज १०० कोटी क्लबमध्ये दाखल होऊ शकतो. इतकंच नाही, तर एक था टायगरपेक्षा सर्वांत जलद १०० कोटी क्लबमध्ये सहभागी होण्याचा मानही मिळवेल.

`कोई मिल गया`, `क्रिश` या चित्रपटाच्या पुढील भाग असलेल्या या चित्रपटात हृतिक रोशन तिहेरी भूमिकेत दिसत आहे. तर प्रियांका चोप्रा, विवेक ओबेरॉय, कंगणा राणावत यांची प्रमुख भूमिका आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 19:39


comments powered by Disqus