Last Updated: Sunday, February 23, 2014, 22:02
www.24taas.com, झी मीडिया, लॉस एंजेलिसमल्लिका शेरावत सध्या कोणाला चोरी चुपके चुपके भेटत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना! तिच्या लॉस एंजेलिसच्या फेऱ्या मात्र वाढल्या आहेत. तिचे सध्या डेट सुरू आहे. कोण आहे तो?
हॉट अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावतकडे पाहिले जाते. ती सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय झाली आहे. सध्या ती लॉस एंजेलिसमध्ये दौरे करत आहे. ती हॉलिवूड स्टार लियनार्डो याला सातत्याने भेटत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्यासोबत तिचा फोटोही प्रसिद्ध झाला आहे.
या दोघांचा लिपलॉकही प्रसिद्ध झाला आहे. मल्लिका आणि लियनार्डो यांचा एकत्र फोटो पाहून त्याच्यातील डेट असल्याचे स्पष्ट होत आहे. २००९ मध्ये तिने हॉलिवूड फिल्म केली होती. तिने `हिस` मध्ये काम केलं आहे. तिच्याबरोबर इरफान खानही होता.
मल्लिका आखणी एक हॉलिवूड फिल्म `पॉलिटिक्स ऑफ लव्ह` मध्ये काम केले आहे.. २०१२ मध्ये अमेरिकी पॉप स्टार ब्रूनो मार्स याच्याबरोबर एका व्हिडिओमध्ये दिसून येते. ती मौज मस्ती करताना दिसत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 23, 2014, 22:02