24taas.com, Lo lalla lut lo is ready for world record

‘लो लल्ला लूट लो’ला बनवायचाय वर्ल्ड रेकॉर्ड!

‘लो लल्ला लूट लो’ला बनवायचाय वर्ल्ड रेकॉर्ड!
www.24taas.com, मुंबई
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता एक चित्रपट आपल्या नावाची नोंद करण्याच्या तयारीत आहे. ‘लो लल्ला लूट लो’ हा तब्बल दोन तासांचा सिनेमा एकाच टेकमध्ये चित्रित केला जाणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर तो निश्चितच नवा रेकॉर्ड असेल.

निर्माते अरुण शक्ती आणि दिग्दर्शक योगेश खोखेर ‘लो लल्ला लूट लो` हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहेत. चित्रपटाची पटकथा तयार असून यातली कलाकारांची निवडही झाली आहे. संजय मिश्रा, सुशांत सिंग, विजय राज, यशपाल शर्मा हे या चित्रपटात दिसतील. सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचं शूटींग करण्याचा बेत निर्मात्यांनी आखलाय.

एका फार्म हाऊसमध्येच एकाच दिवशी... एकाच टेकमध्ये हा दोन तासांचा चित्रपट चित्रीत होणार आहे. यासाठी सगळेच जण ‘रिहर्सल’मध्ये बिझी आहेत. अण्णा हजारे-बाबा रामदेव यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध छेडलेल्या आंदोलनावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. शुटींगच्या वेळी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

First Published: Friday, August 17, 2012, 11:37


comments powered by Disqus