माधुरी दीक्षितचा डबल धमाका

माधुरी दीक्षितचा डबल धमाका

माधुरी दीक्षितचा डबल धमाका

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बहुचर्चित आणि अनेकांना उत्कंठा लावणारा `डेढ इश्किया` या माधुरीचा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटासोबत तिच्या `गुलाब गँग` चित्रपटाचा प्रोमोही दाखवण्यात येणार आहे.

गुलाब गँगमध्ये जुही चावला आणि माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका आहे. `गुलाब गँग` चित्रपटाचं दिग्दर्शन सौमिक सेन यांनी केलं आहे.

गुलाब गँग हा चित्रपट सामाजिक अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या महिला संघटनेपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे. या चित्रपटात माधुरीने सामाजिक कार्यकर्तीची भूमिका पार पाडली आहे. माधुरीचा `गुलाब गँग` ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

माधुरी दीक्षित सात वर्षानंतर पुन्हा फिल्मी दुनियेत परतली आहे. अभिषेक चौबेने डेढ इश्कियाचं दिग्दर्शनं केलं आहे, यातील नसीरूद्दीन शाह आणि अरशद वारसी आणि हुमा कुरेशी यांच्या भूमिकेवर सर्वाचं लक्ष लागून आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 14:21


comments powered by Disqus