मधुर भंडारकर बनवणार नरेंद्र मोदींवर चित्रपट!Madhur Bhandarkar make film on Narendra Modi

मधुर भंडारकर बनवणार नरेंद्र मोदींवर चित्रपट!

मधुर भंडारकर बनवणार नरेंद्र मोदींवर चित्रपट!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा लवकरच मोठ्या पडद्यावर धूम करतांना दिसेल. हो कारण आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर मोदींच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. एवढंच नव्हे तर या बाबतीत भंडारकरांनी मोदींची भेटही घेतलीय.

भंडारकर यांच्या जवळील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, `बऱ्याच काळापासून भंडारकर मोदीबाबत अभ्यास करत आहेत. त्यांच्या आयुष्याबाबत मधुर यांनी खूप रिसर्चही केलाय. शिवाय त्यांची एक टीम अजूनही मोदीबाबत रिसर्च करण्याचं काम करतेय.` मोदींच्या बायोपिक बद्दल जेव्हा भंडारकर यांना विचारलं गेलं, तेव्हा "एक सामान्य व्यक्ती पंतप्रधान होतो, ही याची कहानी असल्याचं त्यांनी सांगितलं."

लोकसभा निवडणुकीदरम्यान मधुर भंडारकर मोदींच्या समर्थनार्थ दिसले. मोदी `विजनरी लीडर` असल्याचं मधुर भंडारकर म्हणतात. सध्या मधुर `कॅलेंडर गर्ल` या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर हे प्रोजेक्ट ते सुरू करतील. नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभालाही मधुर भंडारकर उपस्थित राहणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 24, 2014, 18:43


comments powered by Disqus