Last Updated: Monday, November 5, 2012, 15:03
www.24taas.com, नवी दिल्लीहिंदी चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या विरोधातील बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मधुर भांडारकरला दिलासा मिळाला आहे.
मॉडेल आणि अभिनेत्री प्रीती जैन हिने दिग्दर्शक मधुरने सिनेमात भूमिका देण्याचे सांगून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
जुलै २००४ मध्ये प्रीती जैनने मधुर भांडारकरविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटले होते, चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून १९९९ ते २००४ दरम्यान मधुरने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप प्रीतीने केला होता.
दरम्यान, बलात्काराचे माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हा माझ्याविरुदद्धचा कट आहे, असे सांगून मधुरने हे आरोप फेटाळून लावले होते.
First Published: Monday, November 5, 2012, 15:03