माधुरी दीक्षित करणारं ‘मुजरा’, madhuri dixit will do `mujra` in next movie

माधुरी दीक्षित करणारं ‘मुजरा’

माधुरी दीक्षित करणारं ‘मुजरा’
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लाखो दिलो की धडकन् असलेली माधुरी दिक्षित जेव्हापासून मायदेशी आली आहे तेव्हापासून ती तिच्या फॅन्सना धक्केच देत आहे.माधुरीने आपल्या करिअर सोबत वेगवेगळे प्रयोग करण्याचा तिने जणू निर्धारचं केला आहे.

आता झालं असं की, माधुरी दिक्षितने एका गाण्यावर मुजरा करण्याचं ठरवलं आहे. अभिषेक चौबेचा आगामी सिनेमा `डेढ इशकिया`मध्ये माधुरी एका मुजऱ्यावर नाचणार आहे. विशाल भारव्दाज लिखित `आपके करार में` या गाण्यावर मुजरा करणार आहे. ‘हे गाण तयार असून सिनेमाच्या चित्रीकरणानंतर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. हे गाणं मोठ्ठ असून त्यासाठी सेटही खूप मोठा उभारण्यात येणार आहे.’ अशी माहिती त्या सिनेमाचे निर्माता केतन मारू यांनी दिली.

`विश्वरूपम`साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले बिरजू महाराज माधुरीचा हा मुजरा बसवणार आहेत. माधुरीने याआधी`देवदास` सिनेमात मार डाला या गाण्यावर मुजरा केला होता. विशेष म्हणजे मार डालाचा मुजराही बिरजू महाराजांनी बसवला होता.


ऐश्वर्या रायनेही कजरा रे गाण्यातून मुजरा केला होता. त्यामुळे माधुरीचा मुजरा ऐश्वर्याच्या मुजऱ्यापेक्षा सरस ठरेल का याकडे प्रेक्षकाचं लक्ष लागून राहिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013, 14:54


comments powered by Disqus