…आणि मॅडोनाचा पाय घसरला!, madona fall down because of high heels

…आणि मॅडोनाचा पाय घसरला!

…आणि मॅडोनाचा पाय घसरला!

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क

नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेली अमेरिकेतील पॉपस्टार मॅडोनाचा पाय घसरलाय... होय, तीनं घातलेल्या उंच टाचांच्या सँन्डलमुळे तिच्यावर सर्वांदेखत तोंडावर पडण्याची वेळ आली.

मॅडोना ही कायम चर्चेत राहण्यासाठी काहीतरी विचित्र पेहराव करत असते. यावेळी ती एका अत्यंत पॉश अशा ‘पोश स्की रिसॉर्ट’मध्ये गेली होती. नेहमीप्रमाणे यावेळीही तिने गरजेपेक्षा उंच चप्पल घातली होती.... आणि हॉटेलमध्ये एका ठिकाणी उतार असलेल्या ठिकाणी तिच्या उंच टाचांच्या चप्पलेने तिला दगा दिला.... त्यामुळे ती घसरत खाली घरंगळत गेली.... आणि सर्वांदेखत तोंडावर पडली. या दुर्घटनेत तिच्या उजव्या पायाच्या हाडाला दुखापत झाली आहे.

याआधीही केली ओसबोरने ही अभिनेत्रीही उंच टाचांच्या चपलेमुळे सर्वांसमोर घसरून पडली होती.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 18, 2014, 19:13


comments powered by Disqus