व्हिडिओ: अॅनिमेशन फिल्म ‘महाभारत’चं ट्रेलर लाँच!‘Mahabharat’ movie trailer: Know what the film

व्हिडिओ: अॅनिमेशन फिल्म ‘महाभारत’चं ट्रेलर लाँच!

व्हिडिओ: अॅनिमेशन फिल्म ‘महाभारत’चं ट्रेलर लाँच!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लवकरच आपल्याला ‘महाभारत’ हा सिनेमा अॅनिमेटेड रूपात पाहायला मिळणार आहे. निर्माता जयंतीलाल गाडा यांचा अॅनिमेशनपट ‘महाभारत’चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलाय. या सिनेमात बिग बी, अनिल कपूर आणि विद्या बालनसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी काम केलंय.

या सिनेमात पितामह भीष्मांच्या भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तर अनिल कपूर असेल दानवीर कर्ण, भीम सनी देओल आणि द्रौपदीच्या भूमिकेसाठी आवाज देईल विद्या बालन. यांच्याशिवाय अर्जुनसाठी अजय देवगन, दुर्योधनसाठी जॅकी श्रॉफ आणि शकुनी मामा अनुपम खेर साकारतांना दिसतील.

सध्या चर्चा अशी पण आहे की बॉलिवूडमधील दबंग सलमान खान अॅनिमेशन सिनेमात कृष्णाच्या भूमिकेला आवाज देणार आहे. तेव्हा बघा या स्पेशल सिनेमाचा पहिला ट्रेलर


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ


First Published: Wednesday, November 20, 2013, 13:58


comments powered by Disqus