`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात"Malang` song from `Dhoom 3`: Religious feeling hurt, notice

`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात

`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या आयुष्यातील ३० वर्ष ज्यांनी गाणी लिहिण्यात घालवली असे गीतकार समीर अनजान हे `धूम ३`मधील `मलंग` गाण्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मदारिया सुफी समुदायानं आमीर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

`नझर के सामने` (आशिकी), `तुम पास आऐ` (कुछ कुछ होता है) आणि `कभी कभी खुशी गम` ही गाणी लिहणारे समीर यांना आपल्या `मलंग गाण्याचा अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलंय. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अशा प्रकारचे दावे आणि कायदेशीर समस्या समोर येणं, हा केवळ चित्रपट निर्मात्यांना त्रास देण्याचा एक मार्ग बनला आहे.

`राम-लीला`च्या प्रदर्शनापूर्वीही अशाच समस्या समोर आल्या होत्या. `हाउसफूल २` मधील `अनारकली डिस्को चली` या गाण्याकरताही मला अनावश्यकपणे वादात खेचलं गेलं होतं. अनारकलीला ऐतिहासिक स्थान असल्याचं सांगत लोकांनी माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती, असंही समीर म्हणाले.

`मलंग` हे एक भव्य गाणं आहे. या गाण्यामुळं कोणाच्याही भावना दुखावल्या गेलेल्या नसून हे सुंदर आणि सुफी प्रेमगीत आहे. पण, काहीही कारण नसताना याला कायद्याच्या कचाट्यात खेचण्यात आलंय, असं गीतकार समीर यांना वाटतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 18:03


comments powered by Disqus