…आणि मल्लिका शेरावतनं काढला पळ!, Mallika leaving the hotel, Some peoples raised violence

…आणि मल्लिका शेरावतनं काढला पळ!

…आणि मल्लिका शेरावतनं काढला पळ!
www.24taas.com झी मीडिया, जयपूर

`भंवरी देवी` या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी जयपूरला गेलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत ही अतिशय दुःखी अवस्थेत परत आली आहे. मल्लिका शूटींगसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्या हॉटेलमध्ये अचानक पणे दारू पिऊन काही लोकांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्नांनी त्यांच्या तावडीतून सुटून मल्लिकानं चक्क हॉटेलमधून पळ काढला.

एका वृत्तपत्रानुसार काही नेते आणि प्रमुख व्यवसायिक लोक दारूच्या नशेत तिच्या रूमच्या बाहेर धिंगाणा घालत होते. घाबरलेल्या मल्लिकानं हॉटेलच्या स्टाफला आणि स्पॉट बॉयला फोन केला आणि कशीबशी त्या लोकांच्या तावडीतून सुटून बाहेर निघाली. पण या घटनेमुळं मल्लिका एवढी घाबरून गेली की तिला शूटींग सोडून जावंच लागलं.

घटनास्थळी असणाऱ्या काही लोकांकडून असं समजलं की, `भंवरी देवी`या चित्रपटाच्या शूटींगसाठी मल्लिका या शहरात आली असून ती ज्या हॉटेलमध्ये होती. तिथं तिच्यासाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. तरीदेखील काही लोक हॉटेलमध्ये जाण्यात यशस्वी ठरले. त्यांनी मलिकाच्या रूमच्या दरवाजावर धिंगाणा घातला, अश्लील गाणी गाऊ लागले, त्याचसोबत अश्लिल कमेंटही पास करू लागले.

मल्लिकाच्या काही मित्रांकडून असं कळतंय की, मल्लिका ही पोलिसांकडे तक्रार करणार होती पण त्यानंतर तिला त्या शहरातून निघून जाणंच योग्य वाटलं. एकूणच काय चित्रपटांमध्ये हॉट असलेली मल्लिका या घटनेमुळं मात्र गारठून गेली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 19, 2013, 12:22


comments powered by Disqus