साध्वी ममतानं धुडकावला `बीग बॉस`चा आदेश!, mamta kulkarni refuse to participate in big boss season 7

साध्वी ममतानं धुडकावला `बीग बॉस`चा आदेश!

साध्वी ममतानं धुडकावला `बीग बॉस`चा आदेश!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

छोट्या पडद्यावर विविध गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात गाजलेल्या ‘बीग बॉस’ या कार्यक्रमाचं सातवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. या तथाकथिक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांची चाचपणी निर्मात्यांकडून सुरू झालीय. याचाच एक भाग म्हणून सध्या साध्वी बनून जगासमोर आलेल्या ममता कुलकर्णीलाही या शोमध्ये सहभागी होण्यासाठी विचारण्यात आलं पण ममतानं मात्र या ऑफरला साफ धुडकावून लावलंय.

‘बीग बॉस’ हा कार्यक्रम नेहमीच चर्चेत राहिलाय तो या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या उथळ वागण्यानं... शोचा टीआरपी ध्यानात घेता या शोमध्ये हमखास काही वादग्रस्त सेलिब्रिटींची उपस्थिती नक्की केली जाते. याच कार्यक्रमाच्या येत्या पर्वासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी स्पर्धकांची निवड सुरु केली आहे. या शोच्या निर्मात्यांनी वादग्रस्त अभिनेत्री ममता कुलकर्णीशी संपर्क साधला असून या शोमध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर दिली. ममताला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कमसुद्धा देऊ केली. मात्र, ममताने बिग बॉसची ही ऑफर नाकारल्याचं समजतंय.

ममताने ही ऑफर स्वीकारली असती तर नक्कीच प्रेक्षकांची या शोविषयीची रुची अधिक वाढली असती. ममताचा चौदा वर्षांचा अज्ञातवास... अंडरवर्ल्ड डॉन विक्की गोस्वामीबरोबर लग्नाच्या चर्चा आणि इतक्या वर्षानंतर एका साध्वीच्या रुपात जगासमोर अवतरलेली ममता कुलकर्णी या शो मध्ये सहभागी झाली असती तर या कार्यक्रमाचा टीआरपी नक्कीच वाढला असता, यात शंका नाही!

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 30, 2013, 12:10


comments powered by Disqus