मी ईश्वरचरणी समर्पित- ममता कुलकर्णी Mamta kulkarni turns completely spiritual

मी ईश्वरचरणी समर्पित- ममता कुलकर्णी

मी ईश्वरचरणी समर्पित- ममता कुलकर्णी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडमध्ये ९० च्या दशकात करण- अर्जुन, बाजी, वक्त हमारा है, घातक यांसारख्या सिनेमांतून गाजलेल्या आणि मॉडेलिंगच्या जगात खळबळजनक फोटोंमुळे ‘सेक्स सिम्बॉल' ठरलेल्या ममता कुलकर्णीने पतीसोबत इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा जोरात असताना आपण लग्नच केलं नसून सध्या पूर्णपणे आध्यात्मिक बनलो असल्याचं ममता कुलकर्णीने म्हटलं आहे.

४१ वर्षीय ममता कुलकर्णीने आपल्या लग्नाच्या आणि धर्मांतराच्या बातम्यांना वैतागून एका वेबसाईटवर स्पष्टीकरण दिलं आहे. तिच्या आणि विकी गोस्वामीच्या विवाहाला अफवा असल्याचं सांगत ममता कुलकर्णीने म्हटलं आहे की मी पूर्णपणे आध्यात्माला वाहून घेतलं आहे. “मी गेल्या १२ वर्षांत मेक-अप केला नाही. तसंच स्वतःचा चेहराही आरशात पाहिला नाही. मी लग्न केलेलं नाही आणि करणारही नाही. विकी गोस्वामीवर माझं प्रेम आहे. पण त्यालाही हे माहित आहे, की मी पूर्णपणे आता ईश्वराला समर्पित आहे.”

“गेल्या १२-१३ वर्षांपासून माझ्या कुटुंबाला माहित आहे की मी कुठलं आयुष्य जगत आहे. २४ तासांपैकी १८ तास मी भगवंताच्या सेवेत लीन असते. गेल्या बारा वर्षांत मी कुठलाही सिनेमा पाहिला नाही. एवढंच नव्हे तर ना मी मेक अप केला ना स्वतःचा चेहरा आरशात पाहिला.” असं ममता कुलकर्णीने वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे.

ममता कुलकर्णीने लग्न करून इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या बातम्या यापूर्वी प्रसिद्द झाल्या होत्या. मात्र या अफवा असल्याचं ममता कुलकर्णीने म्हटलं आहे. तसंच तिला पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याबद्दल विचारलं असता तिने म्हटलं “तुपाचं पुन्हा दूध बनणं जसं अशक्य आहे, वाल्मिकींचा वाल्या बनणं जसं अशक्य आहे, तसंच माझं पुन्हा बॉलिवूडला येणं अशक्य आहे. सलमान, शाहरुख, आमिर हे माझे एके काळी माझे हिरो होते. आता मात्र माझे हिरो, माझे पती आणि धर्म भगवंतच आहेत.”

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 21, 2013, 16:21


comments powered by Disqus