Last Updated: Saturday, December 1, 2012, 21:48
www.24taas.com, मुंबईबॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समजते आहे. पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय मनिषाने घेतला आहे.
अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज सकाळी जसलोक रूग्णालयातून सोडण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार मनिषाला चक्कर आल्यानंतर तिला बुधवारी मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची अचानक तब्येत खराब होण्याचं कारण समजू शकलेलं नव्हतं.
जसलोक रूग्णालयाचे प्रवक्ता कृष्णकांत दास्यम यांनी सांगितले की, मनिषाला बुधवारी सकाळीच सोडण्यात आलं आहे. मनिषाने तिच्या तब्येतीविषयी काहीही सार्वजिनकरित्या सांगण्यास मनाई केल्याने मला त्याबाबत काहीही माहिती देण्याची परवानगी नाही.
४२ वर्षीय मनिषा नेपाळच्या मोठ्या परिवारातून आलेली आहे. तिने बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. तिचा पहिला सिनेमा १९९१ मध्ये सौदागर हा आला होता. नुकतचं त्यांनी राम गोपाल वर्मा यांचा `भूत रिटर्न्स` या सिनेमातून पृर्न:प्रदार्पण केलं होतं.
First Published: Saturday, December 1, 2012, 21:36