Last Updated: Wednesday, May 15, 2013, 16:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेत्री मनिषा कोईराला अखेर कर्करोगावर मात करण्यात यशस्वी झालीय. ही बातमी जेव्हा खुद्द मनिषाला समजली तेव्हा मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिनं मनसोक्त रडून घेतलं. ‘माझा हा पुनर्जन्म असल्याचं मनिषानं म्हटलंय’.
मनिषाचा कर्करोग आता बरा झाला असला तरी तिच्यावर उपचार मात्र आणखी काही काळ सुरू राहणार आहेत. ती म्हणते, ‘जेव्हा मला कर्करोग झाल्याचे निदान झाले तेव्हा माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. या कठिण काळात मला तुमच्या प्रार्थना आणि आर्शिवादने आधार दिला. मला पूर्णपणे तंदूरुस्त होण्यासाठी अजून काहीवेळ लागणार आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानतंर मला कुटुंबीय, मित्र परिवार आणि कॅन्सर क्लबच्या सदस्यांनी कर्करोगाशी लढण्यासाठी प्रेरणा दिली. माझा आत्मविश्वास वाढवला. तुमच्या सर्वाच्या प्रेम आणि आर्शिवादामुळे माझा पूर्नजन्म झाला आहे’. एका सोशल वेबसाईटवर मनिषानं आपल्या भावना व्यक्त केल्यात.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईतील जसलोक रुग्णालयात मनिषाला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर ती अधिक चांगल्या उपचारांसाठी अमेरिकेला गेली होती.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 15, 2013, 16:17