Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:33
www.24taas.com, न्यूयॉर्ककॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.
या संदर्भात मनीषाचे मॅनेजर सुब्रतो घोष म्हणाले, “मनीषा कोइराला हिची सोमवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रिया झाली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. मनीषाचे आई, वडील आणि भाऊ सध्या तिच्यासोबत आहेत. तसंच तिची एक जवळची मैत्रीणही तिच्यावरोबर आहे.”
२८ नोव्हेंबर रोजी मनीषा कोइराला चक्कर येऊन पडल्यामुळे तिला जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिला नेमका काय आजार झाला आहे, हे स्पष्ट झालं नव्हतं. कालांतराने तिला कॅन्सर असल्याचं स्पष्ट झाल्यावर पुढील उपचारांसाठी मनीषा अमेरिकेला रवाना झाली.
नेपाळच्या मनीषा कोइरालाने १९९१साली ‘सौदागर’ या सिनेमातून बॉलिवूडम पदार्पण केलं होतं. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘अग्निसाक्षी’, ‘दिल से’ इत्यादी सिनेमांमुळे ती लोकप्रिय झाली होती.मधल्या काळात सिनेमांमधून काम करणं बंद केल्यावर यावर्षी राम गोपाल वर्माच्या ‘भूत रिटर्न्स’ या सिनेमातून ती पुन्हा बॉलिवूडमध्ये दाखल झाली.
First Published: Tuesday, December 11, 2012, 17:33