Last Updated: Tuesday, October 15, 2013, 17:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमराठी कलाकारांनी सिनेमांतून जग पादाक्रांत करायला सुरुवात केलीये. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपले अनेक कलाकार येतायेत. अशीच अभिमानी स्थिती असताना त्यात आणखी एक गौरवास्पद गोष्ट ठरलीये ती अभिनेत्री उषा जाधवच्या रुपानं...
सर्वोत्कृष्ट अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक मिळवल्यानंतर तिची दखल घेतलीये आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या फॅशन मॅगझिन ‘व्होग’नं... गौरव जय गुप्ता या ड्रेस डिझायनरनं आपल्या साड्यांसाठी मॉडेल म्हणून उषाची निवड केलीये...
या आधी गौरवनं राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावेळी उषाची साडी त्यानं डिझाईन केली होती. ऑक्टोबरच्या अंकात हे फोटो येणार असले तरी त्याचं शूट दिल्लीत मेमध्येच करण्यात आलं होतं. ‘वोग’ या फॅशन मॅगझिनवर झळकून उषानं मराठी कलाकारांची मान अधिकच उंचावलीये.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 15, 2013, 17:10