Last Updated: Monday, February 25, 2013, 16:18
www.24taas.com, रांचीसिद्धांत मुळ्येच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर वीर मराठीने रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेल्या संघर्षपूर्ण सामन्यात भोजपुरी दबंगला दोन विकेटने पराभूत केले.
भोजपुरी दबंगने सुरूवातील फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा केल्या होत्या. भोजपुरी दबंगच्या १७५ धावांचा पाठलाग करताना मराठी टीमच्या सिद्धांत मुळ्येने १०३ धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. सामन्यात नाबाद १०३ धावा करणाऱ्या सिद्धांत मुळ्ये याला मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले.
भोजपुरी दबंगचा कर्णधार मनोज तिवारी याच्या शानदार कामगिरीमुळे त्याला एफिशिएंट प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब देण्यात आला. तिवारी म्हणाला मला दुःख आहे की माझ्याशिवाय इतर कोणीही चांगली कामगिरी करू शकलं नाही. परंतु, पुढील सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू....
तर विजेता संघाचा कर्णधार रितेश देशमुखने सांगितले की, हा संपूर्ण संघाचा विजय आहे. रांचीतील प्रेक्षकांनी दाखविलेल्या प्रेमाबद्दल त्याने त्यांचे आभार मानले.
First Published: Monday, February 25, 2013, 16:18