Last Updated: Saturday, August 3, 2013, 12:44
www.24taas.com झी मीडीया, मुंबईचित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी अखेर राजीनामा दिलाय. कोल्हापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षीक सभेत प्रचंड गोंधळ झाला.
सभासदांनी पुणे इथं झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमावर उधळलेल्या पैसा संदर्भात महामंडळाच्या अध्यक्षांवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी आपण अध्यक्षपादाची सूत्रे सोडत असल्याचं सांगत पाय उतार झाले. पण अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी महामंडळाचे ७ लाख ३४ हजार रुपये रोख पैसे स्वताजवळ का ठेवले असा जाब विचारत सभासदांनी त्यांच्यासह संचालकांना धारेवर धरलं.
यावेळी मंडळाचे सहखजानिदार अनिल निकम यांनी आपल्याला या पैशाबाबात सुर्वे यांना माहिती दिली नाही, फक्त को-या चेकवर सह्या घेतल्या असं म्हणत आपल्या सहखजानिदार पदाचा राजीनामा दिला,त्यामुळं सभेमध्ये आणखीच गोंधळ उडाला.
जवळपास पाच तास चाललेल्या सभेत फक्त आरोप आणि प्रत्यारोपच झाले.पण मराठी चित्रपट सृष्टीचे प्रश्न सुटण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही,त्यामुळं अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त केलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 3, 2013, 12:23