मराठी मुलीचा 'सुवर्ण प्रवास', सामान्य मुलगी ते अभिनेत्री, Marathi Girl.., normal girl to actress

मराठी मुलीचा 'सुवर्ण प्रवास', सामान्य मुलगी ते अभिनेत्री

मराठी मुलीचा 'सुवर्ण प्रवास', सामान्य मुलगी ते अभिनेत्री
www.24taas.com, पुणे

मराठी मुलं-मुली कुठेही मागे नाहीयेत, याचीच पुन्हा एकदा प्रचिती पुण्यातील सुवर्णा काळे या सामान्य कुटुंबातील मराठमोळ्या तरूणीने आणून दिली आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करत सुवर्णा काळे हिनं अभिनय क्षेत्रात नवी भरारी घेतली आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणारी सुवर्णा आता रुपेरी पडद्यावर झळकली आहे. तेही मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि मकरंद यांच्यासह...

सुवर्णा या टोपीखाली दडलंय काय या मराठी सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. अभिनयाची आवड असलेल्या सुवर्णाने शुक्राची चांदणी या कार्यक्रमाचे जवळपास २ हजार प्रयोग केले आहेत. तेच परिश्रम आणि कुटुंबीयांची साथ यामुळं अभिनयाचं स्वप्न पूर्ण झाल्याचं तिनं सांगितलं आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य असं काहीच नसतं हेच सुवर्णानं दाखवून दिलं आहे.

सामान्य मुलगी ते मराठीतली अभिनेत्री ! असा सुवर्णाचा प्रवास झाला आहे. सुवर्णा काळेचं रुपेरी पडद्यावर पदार्पण`या टोपीखाली दडलंय काय`या सिनेमातून झाले. ती यापुढेही अशीच उत्तरोत्तर प्रगती करीत राहिल अशीच अपेक्षा. `झी २४ तास`कडून तिला शुभेच्छा...

First Published: Wednesday, February 6, 2013, 11:30


comments powered by Disqus