‘दुनियादारी’चा नवा विक्रम Marathi movie Duniyadari`s new record

‘दुनियादारी’चा नवा विक्रम

‘दुनियादारी’चा नवा विक्रम
www.24tass.com, झी मीडिया, मुंबई

झी टॉकीजच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय. आजपासून ‘दुनियादारी’चे तब्बल ७१० शो राज्यासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकातही झळकणार आहेत.

कॅमेरामन संजय जाधव यांचा `दुनियादारी` हा मराठी सिनेमा १९ जुलैला झळकला. सुहास शिरवळकर लिखित `दुनियादारी` ही कादंबरी आजही तरूणांना आपलीशी वाटते. याच कादंबरीवर दुनियादारी हा चित्रपट आहे. या मराठी सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. मराठीचा मुद्दा हाती घेत शाहरूखच्या `चेन्नई एक्स्प्रेस`साठी दुनियादारी या मराठी चित्रपटाचा शो काढल्यास खबरदार, असा दमच मनसेनं शाहरूख खानला दिला होता. मात्र निर्माते रोहित शेट्टी यांनी राज यांची भेट घेतल्यानंतर चित्रपटाबाबत मनसेचा विरोध मावळला.

या सर्व वादावर मात करत आज दुनियादारीनं नवा विक्रम प्रस्तापित करुन मराठी चित्रपट सृष्टीची मान अभिमानानं उंचावलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 2, 2013, 17:42


comments powered by Disqus