दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!Marathi Movie Timepaas earned 30 Cr. in four w

दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!

दगडू-प्राजक्तानं वेड लावलं, `टाइमपास` झाला ३० कोटींचा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मराठी सिनेजगतात प्रथमच तीन आठवड्यात ३० कोटींची विक्रमी कमाई करुन `टाइमपास` या सिनेमानं इतिहास रचलाय. एस्सेल व्हिजन निर्मित `टाइमपास` या सिनेमानं मराठी सिनेमांच्या इतिहासात अभूतपूर्व विक्रमी नोंद केली आहे.

दगडू- प्राजक्ताची ही आगळी वेगळी प्रेमकथा चौथ्या आठवड्यातही रसिकांच्या मनावर राज्य करतेय. दुनियादारी हा सिनेमा टाइमपास पेक्षा अनेक दिवस आधी आला आहे. तरीही टाइमपासनं दुनियादारीची बरोबरी केलीय.

`टाइमपास`ची गाणी लोकांनी डोक्यावर नाही तर डोक्यात घेतली आहेत. फुलपाखरू छान किती दिसते, या गाण्याच्या लोकप्रियतेची लहर आली आहे. आणि कहर असा झालाय की, `थ्रीडी शोले`लाही आपल्या टाइमपास सिनेमाची बरोबरी करता आलेली नाही.

शोलेलाही `चल धन्नो` हो बाजूला असं सांगून टाइमपासने बाजूला सारलं आहे. ज्यांना टाइमपास सिनेमा आवडला, आणि ज्यांना नाही आवडला त्यांनीही, हा सिनेमा पुन्हा पुन्हा जाऊन पाहिला आहे. एवढंच नाही तर टाइमपास सिनेमा अजूनही सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू असल्याने, अजून टाइमपास पाहता आलेला नाही, असं सांगणारे प्रतिक्षेत असणारे अनेक आहेत.
दगडू आणि प्राजक्ताचीही केमेस्ट्री अनेकांना घायाळ करते, या सिनेमातलं भोळंभाबळं प्रेम अनेकांना आवडलंय. या सिनेमाने मराठी सिनेमात एक नवा ट्रेन्ड आणलाय, पण दगडू आणि प्राजक्ताची सर कुणालाच येणार नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 25, 2014, 08:02


comments powered by Disqus