मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म, Mary Kom in Sanjay Leela Bhansali`s film?

मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म

मेरी कोमवर काढणार संजय लीला भन्साली फिल्म
www.24taas.com, नवी दिल्ली

लंडन ऑलिंपिक कांस्य पदक विजेती आणि पाच वेळची विश्व विजेती मेरी कोमच्या जीवनावर आता चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. कास्यं पदक मिळविल्यावर तिचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. त्यामुळेच आता दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमच्या कर्तृत्वावर खूश होऊन एक चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेरी कोमने संजय लीला भन्सालीची भेट घेतली होती. चित्रपटात काम करशील का?, असे संजयने तिला विचारले. “ मी अभिनयात चांगली नाहीय, मी बॉक्सिंगच्या रिंगमध्येच ठीक आहे, असे मेरीने तात्काळ सांगितले होते. मला नाही माहित माझी भूमिका कोण साकारणार, पण यासाठी लागेल ती मदत करायला मी तयार असल्याचे मेरीने यावेळी सांगितले. हा चित्रपट तरूण बॉक्सर्ससाठी प्रेरणादायी असेल, असे संजयने या चित्रपटासंदर्भात सांगितले.

महिला बॉक्सिंग गेममध्ये जिंकल्यानंतर तुझ्या आयुष्यात खूप ग्लॅमर आला आहे तर त्याचा प्रोफेशनल लाईफवर काही परिणाम होतोय का? असे पत्रकारांनी विचारले असता मेरी म्हणाली, लोकं जेव्हा माझा हसत गौरव करतात तेव्हा मला फार छान वाटत. मी फक्त बॉक्सिंगसाठीच बनली आहे. आणि हे जे सर्व काही मला मिळत आहे ते बॉक्सिंगमुळेच मिळत आहे. मी जशी आहे तशीच मी राहणार आहे.

First Published: Thursday, October 4, 2012, 19:04


comments powered by Disqus