Last Updated: Monday, January 14, 2013, 20:49
www.24taas.com, नवी दिल्ली विशाल भारदवाज दिग्दर्शित ‘मटरु की बिजली का मन्डोला’ गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. व्यंगात्मक पद्धतीनं सादर करण्यात आलेल्या या राजकीय आणि जमिन घोटाळ्यांवर आधारित सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली.
‘मटरु की बिजली का मन्डोला’ या सिनेमाची पहिल्याच दिवसाची कमाई होती ७.०२ करोड रुपये... होय, ३३ करोड रुपये खर्चुन तयार बनविल्या गेलेल्या या सिनेमाची एका दिवसाची ही कमाई आहे. विशाल भारद्वाज याने या सिनेमाचा सहनिर्माता म्हणून काम पाहिलंय.
या सिनेमात इमरान खान, अनुष्का शर्मा, शबाना आजमी आणि पंकज कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
First Published: Monday, January 14, 2013, 20:48