Last Updated: Tuesday, April 30, 2013, 14:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सलमानने त्याचा आगामी चित्रपट मेंटल २२ नोव्हेंबरला रिलीज करण्याचा निर्णय केला होता. परंतु सलमानचा भाऊ आणि मेंटल सिनेमाचा निर्माता सोहेल खानने सलमानच्या म्हणण्याला चक्क टाळलं आहे.
सोहेलच्या म्हणण्यानुसार मेंटल सिनेमा २२ नोव्हेंबरला रिलीज करण्याबाबत काहीही योजना बनवण्यात आली नव्हती. सोहेलच्या या सिनेमात त्याचा भाऊ प्रमुख भूमिकेत आहे. २२ नोव्हेंबरला माझा सिनेमा रिलीज होणार आहे ही गोष्ट माझ्यासाठीपण नवीन आहे. माझा सिनेमा रिलीज कधी करायचा आता हे लोकं ठरवू लागले आहेत. ज्या जलद गतीने सिनेमाचं शूटींग पूर्ण होचत आहे त्यानुसार वर्षाच्या शेवटी सिनेमा रिलीज होऊ शकतो परंतु मी सिनेमा रिलीज करण्याची तारीख अजून निश्चित केली नाही.
सोह्लच्या या निर्णयामुळे कोणाला फरक पडो किंवा नाही पडो मात्र संजय लीला भन्साळीला नक्की फरक पडेल. करण २२ नोव्हेंबरला मेंटल रिलीज करण्याच्या निर्णयामुळे संजय लीला भन्साळीच्या तोंडाचं पाणी पळालं होतं. मेंटल सिनेमात दक्षिण भारतीय सिनेमाची अभिनेत्री डेजी शाह सलमानची नायिका आहे. सना खान, वत्सल सेठ, अश्मित पटेल आणि मुकुल देव हेही या सिनेमात काम करत आहेत.
First Published: Tuesday, April 30, 2013, 14:52