`मिल्खा`ची दौड आता करमुक्त! `Milkha` run tax free

`मिल्खा`ची दौड आता करमुक्त!

`मिल्खा`ची दौड आता करमुक्त!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा राज्यात करमुक्त करण्यात आलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय घेतलाय.. पुढील सहा महिन्यांपर्यंत हा सिनेमा करमुक्त असणार आहे.

हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पदक विजेते मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारीत आहे. हा सिनेमा खेळावर आधारीत असल्यामुळे खेळाडूंना तसेच तरुणांना प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. हा सिनेमा NFDC या केंद्र शासनाच्या उपक्रमाद्वारे सहनिर्मित आहे.

हा सिनेमा करमुक्त करण्याच्या मागणीसाठी अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा दोन दिवसांपूर्वीच महसूलमंत्र्यांना भेटले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 20, 2013, 20:19


comments powered by Disqus