मनसे चित्रपट अध्यक्षांशी मैत्री, अभिजीत पानसेंची गच्छंती, MNS Amay Khopkar and Abhijit panse friendship

मनसे चित्रपट अध्यक्षांशी मैत्री, अभिजीत पानसेंची गच्छंती

मनसे चित्रपट अध्यक्षांशी मैत्री, अभिजीत पानसेंची गच्छंती
www.24taas.com, मुंबई

शिवसेनेच्या चित्रपट सेनेत पदाधिका-यांच्या नेमणुकीवरून धुसपूस सुरू झालीय. अध्यक्षपदावरून अभिजीत पानसे यांची गच्छंती करून आदेश बांदेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शरद पोंक्षे आणि दिगंबर नाईक यांची उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलीय. याबाबत सध्या शिवसेना भवनात बैठक सुरू आहे.गेल्या आठवड्यात चित्रपट सेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. अभिजीत पानसेंना मनसे चित्रपट संघटनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची मैत्री भोवल्याची चर्चा शिवसेनेत रंगलीय.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद अभिजीत पानसे यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर युवा सेनेची स्थापना झाल्याने शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. पण अमेय खोपकर यांच्याशी असणारे मैत्रीचे संबंध त्यांना भोवली असल्याची चर्चा रंगली आहे.

First Published: Thursday, April 4, 2013, 14:51


comments powered by Disqus