`लई भारी`च्या लॉन्चिंगला आली प्रेग्नेंट जेनेलियाMommy to be Genelia Dsouza attends Lai Bhari launch

`लई भारी`च्या लॉन्चिंगला आली प्रेग्नेंट जेनेलिया

`लई भारी`च्या लॉन्चिंगला आली प्रेग्नेंट जेनेलिया
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मराठी चित्रपट लई भारीच्या लॉन्चिंगसाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटिजनी हजेरी लावली. मात्र सर्वांची नजर होती ती ऑफ व्हाईट अनारकली ड्रेसमध्ये असलेल्या जेनेलियाकडे... कारण जेनेलिया प्रेग्नेंट असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कोणत्या तरी इव्हेंटमध्ये दिसली.

रितेश देशमुख चित्रपट `लई भारी`मधून मराठी चित्रपटांमध्ये डेब्यू करतोय. लॉन्चिंगच्या वेळी जेनेलिया आपल्या अंदाजामध्ये हसत होती. तर रितेश प्रत्येक क्षणी जेनेलियाची काळजी घेत होता. जेनेलिया आणि रितेश आपल्या पहिल्या बाळासाठी खूप उत्सुक आहे.

मातृत्वाची चाहुल जेनेलियामध्ये दिसत होती. कारण आधी पेक्षा ती थो़डी जाड वाटत होती. आपल्या अनेक वर्षांच्या अफेअरनंतर जेनेलिया आणि रितेश 2012मध्ये विवाहबद्ध झाले. दोघांची पहिली भेट `तुझे मेरी कसम` या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवरच झाली होती. 2003मध्ये रिलीज झालेल्या या फिल्मनंतर दोघांमधली मैत्री वाढली, मैत्री प्रेमात आणि प्रेमाचं लग्नात रुपांतर झालं आणि आता ही जोडी आपल्या आयुष्याच्या नव्या वळणावर आहे. दोघांनाही त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 15:08


comments powered by Disqus