Last Updated: Sunday, March 31, 2013, 11:36
www.24taas.com,मुंबईसोनी टीव्हीच्या क्या हुआ तेरा वादा या मालिकेत महत्त्वाची भूमिका करणाऱ्या मोना सिंग अश्लिल MMS क्लिप प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. हा माझा MMS नसल्याचा निर्वाळा मोनाने दिलाय.
अश्लिल MMS संदर्भात मोनाने तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांचा सायबर विभाग MMS तयार करणा-या तसेच तो असंख्य मोबाइलवरुन फिरवणा-यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मोनासारख्या दिसणाऱ्या महिलेचा अश्लिल एमएमएस तयार करुन तो मोनाची न्यूड फिल्म असल्याचे सांगत असंख्य स्मार्टफोन धारकांना पाठवला आहे.
जस्सी जैसी कोई नहीं ही टीव्ही मालिका आणि थ्री इडियट्स सिनेमामुळे लोकप्रिय झालेल्या मोनाने MMS प्रकरणाचा मास्टरमाईंड लवकरच सापडेल, अशी आशा मोनाने व्यक्त केली आहे.
मोना सिंगने म्हटले आहे की, मला MMS संदर्भात सर्व काही माहित आहे. यावेळी मी सांगू इच्छीते की MMS खोटा आहे. यात दाखविण्यात आलेली मुलगी मी नाही.
First Published: Sunday, March 31, 2013, 08:24