मला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे - मोना सिंग, Mona Singh Statement about MMS

मला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे - मोना सिंग

मला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे - मोना सिंग
www.24taas.com, मुंबई

टीव्ही ऐक्ट्रेस मोना सिंगने अश्लिल एम.एम.एस. प्रकरणी मुंबईच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केलीय.. हा अश्लिल एम.एम.एस. तिचा नसून तिच्या चेह-याला दुस-या कुणाच्या चेह-यावर मॉर्फ करून तयार केला गेला असल्याचं मोना सिंगचं म्हणणय. आता हा एम.एम.एस.कुठल्या कंप्यूटर वरून अपलोड केला गेला आहे याचा पोलीस तपास करतं आहे.

टीव्ही ऐक्ट्रेस मोना सिंगचा एक एमएमएस सध्या खूपच चर्चेत आहे..वीस सेकंदाचा हा व्हिडियो आम्ही आपल्याला दाखवू शकत नाही मात्र तो निश्चितच अत्यंत अश्लील आहे...हे अत्यंत अनैतीक आहे...दुस-याच्या चेह-यावर माझा चेहरा लावण्यात आलाय...ती मी नव्हेच... मी एका चांगल्या कुटुंबातील असून मला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचं मोना सिंगचं म्हणणय....

मोनासिंगने अश्लिल एसएमएस प्रकरणी सायबर सेलमध्ये गुन्हा नोंदवला अहे.. ज्या कंप्यूटरवरून हा व्हिडियो अपलोड केला गेला त्या कंप्यूटरच्या आय पी ऐड्रेसचा पोलीस आता शोध घेत आहेत. जस्सी जैसी कोई नही,क्या हुआ तेरा वादा या मालिंकामधून हिट झालेल्या मोनाची लवकरच,विद्युत जमावाल दिग्दर्शित कमांडो फिल्म रिलीज होतेय.. त्या आधी हा एम.एम.एस.प्रसारित झाल्याने विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत...


First Published: Tuesday, April 2, 2013, 16:52


comments powered by Disqus