बराक ओबामांची भेट घेणार आमिर खान, Mr. perfectionist Aamir Khan will meet with Barack Obama

बराक ओबामांची भेट घेणार आमिर खान

बराक ओबामांची भेट घेणार आमिर खान
www.24taas.com,मुंबई

चर्चेत असणाऱ्या ‘टाइम’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर या वर्षी स्थान पटकावणारा आमिर खान हा लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेट घेऊन चर्चा करणार आहे.

आमिर खान आपला नवा सिनेमा काढत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अमेरिकेत सुरू आहे. आमिरचा ‘धूम 3’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही कारणास्तव या सिनेमाचे शुटींग थांबविण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आमिर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे काही दिवस सिनेमाचे शुटींग होणार नाही. दरम्यान, या कार्यक्रमाला बराक ओबामाही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे याच कार्यक्रमात दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.


ओबामा भारत दौऱ्यावर आले असता त्यांनी आमिर खानला भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी आमिरने त्यांची भेट घेतली होती. यावेळी ओबामा यांनी आमिरला अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले होते. पुढील सिनेमा अमेरिकेत शुटींग करण्यासाठी आमिरला भेटी दरम्यान सांगितले होते.

आमिरने एका वृत्तपत्राला सांगितले की, ज्या कार्यक्रमाला ओबामा उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळत आहे. हा माझ्यासाठी सन्मानाचा योग आहे. मिशेल ओबामा यांनी सांगितले की, ‘रंग दे बसंती’ या माझ्या गाण्यावर नृत्य करण्यास मला खूप आवडते. ही माहिती आमिरने दिलेय.

First Published: Tuesday, April 23, 2013, 16:14


comments powered by Disqus